''मी'' चा शोध ''होमिओपॅथीच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न.” — डॉ. शितल देवरकर.
- by
- Oct 05, 2026
नमस्कार,
मी डॉ. शितल. सध्या ऐरोली येथील असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (ए.आर.एच) अंतर्गत कार्यरत असलेल्या होमिओपॅथिक आंतररुग्ण विभाग( आयपीडी) मध्ये इंचार्ज म्हणून काम करत आहे.
माझा वैद्यकीय प्रवास पारंपरिक मार्गाने सुरू झाला. BHMS पूर्ण केल्यानंतर माझा कल अॅलोपॅथीकडे अधिक झुकलेला होता. क्लिनिकल एक्सपोजर, तात्काळ परिणाम देणारी उपचारपद्धती ,या सगळ्यांनी मला आकर्षित केलं. दोन वर्षे मी हॉस्पिटलमध्ये वॉर्ड आर.एम.ओ . म्हणून काम केलं. आयसीयू इंटेन्सिविस्ट होण्याचं स्वप्न डोळ्यांत ठेवून मी ' इमर्जन्सी मेडिकल सर्विस' (ई.एम.एस) हा कोर्सही पूर्ण केला आणि त्या दिशेने माझं करिअर पुढे सरकत होतं.
मात्र, या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कायम जाणवत होती—मनातली एक पोकळी.
रुग्णांवर उपचार होत होते, पण “खरं समाधान” कुठेतरी हरवत होतं. केवळ लक्षणांवर उपचार करण्यापेक्षा, रुग्णाच्या मूळ समस्येला समजून घेऊन त्याला आतून बरे करण्याची ओढ मनात निर्माण होत होती. याच काळात माझ्या आयुष्यात एक नवीन वळण आलं—'लग्न'.
लग्नानंतर माझ्या पतीमार्फत मला ऐरोली येथील ए.आर.एच. बद्दल माहिती मिळाली. सुरुवातीला केवळ उत्सुकतेपोटी मी तिथे भेट दिली. पण तिथे पाहिलेली पूर्णपणे होमिओपॅथिक प्रॅक्टिस माझ्यासाठी डोळे उघडणारी ठरली. इथे रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच होता— रुग्ण म्हणजे केवळ आजार नव्हे, तर एक संपूर्ण व्यक्तिमत्व. त्याच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक पैलूंना समजून घेत उपचार केले जात होते. हे पाहून मला एक वेगळंच समाधान मिळालं—जे मी आतापर्यंत शोधत होते.
मी ए.आर.एच मध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू होमिओपॅथीबद्दलचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलत गेला. ही केवळ एक पर्यायी उपचारपद्धती नसून, शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती जागृत करून त्याला स्वतःच बरे होण्यास मदत करणारी एक सखोल आणि प्रभावी वैद्यकीय शास्त्र आहे, याची मला प्रचिती आली. या नव्या जाणिवेने प्रेरित होऊन मी होमिओपॅथीमध्ये एम. डी. पूर्ण केला आणि माझ्या करिअरला एक स्पष्ट, समाधानकारक दिशा मिळाली.
अलीकडेच ए.आर.एच ने “सहयोग होमिओपॅथिक आईपीडी” सुरू केली आहे— जिथे रुग्णांना पूर्णपणे होमिओपॅथिक उपचार दिले जातात. या विभागाची इंचार्ज म्हणून काम करताना मला अनेक रुग्णांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची संधी मिळते आहे. येथे आम्ही ब्रॉन्कियल अस्थमा, डेंग्यू, चिकनगुनिया, जुलाब, उलट्या यांसारख्या विविध अक्यूट आजारांवर उपचार करतो. रुग्णांच्या प्रकृतीत होणारे बदल, त्यांच्या आरोग्यातील सुधारणा आणि त्यांच्या चेहऱ्यावर परतलेलं हसू—हीच माझ्या कामाची खरी कमाई आहे. एकेकाळी होमिओपॅथीबद्दल शून्य रस असलेली मी, आज त्याच क्षेत्रात माझी खरी ओळख शोधली आहे. व्यावसायिक आयुष्याबरोबरच, मी माझं घर आणि माझं बाळ यांची जबाबदारीही तितक्याच प्रेमाने आणि संतुलनाने सांभाळते.
करिअर आणि कुटुंब यामधला समतोल साधणं—माझ्यासाठी हेच खऱ्या अर्थाने यश आहे, हे मला होमिओपॅथी प्रॅक्टिस मुळेच शक्य झालं आणि या संपूर्ण प्रवासात ए.आर.एच चा मला खूप मोठा आधार मिळाला आहे.
विशेषतः माझ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे आणि सततच्या पाठिंब्यामुळेच मी आज या ठिकाणी उभी आहे. त्यांच्या विश्वासामुळे आणि योग्य दिशा दाखविल्यामुळे माझ्या करिअरला ही नवी उंची मिळाली आहे.
माझा हा प्रवास केवळ माझ्यापुरता मर्यादित नाही ही प्रत्येक त्या स्त्रीची कींवा मुलीची कथा आहे, जी स्वतःला पुन्हा शोधते, नव्याने उभी राहते आणि आपल्या कर्तृत्वाने समाजात सकारात्मक बदल घडवते. आज मला अभिमानाने म्हणावंसं वाटतं— मी फक्त एक डॉक्टर नाही, तर एका सकारात्मक बदलाचा एक भाग आहे.
डॉ. शितल देवरकर
एम.डी (होमिओपॅथी)
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
With an MBA in Marketing (First Class with Distinction) and a deep passion for business strategy and innovation, I aim to bring new ideas to life through clarity, creativity, and strong leadership. As the Director of The Global Times, I focus on driving growth, building meaningful collaborations, and creating opportunities that make an impact. My vision is to take our brand to global heights — through digital innovation, smart planning, and ethical business practices. I’m constantly learning, evolving, and planning to pursue my PhD further — because growth never stops.
Krutika Manali Tushar KhanvilkarDedicated to empowering teams, inspiring people, and setting new standards of excellence in the industry.